परत येणे?

एकदा आपल्या आयुष्यातून निघून गेलेल्या व्यक्तीच्या परत येण्याला किती-सा अर्थ असतो? जो एकदा सोडून गेला तो परत ही जाऊ शकतो हे खरं नाही का? कुणाच्या असण्याला आपण किती मान द्यावा? कुणावर किती-सा विश्वास ठेवावा? कुणी आपल्याला कसं पटवून दिल्यावर विश्वास ठेवावा? असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून असतात. काही बोलून दाखवतात काही गुपचूप राहून विचारच करत राहतात. काही प्रश्नांची उत्तरं शोधतात, पण काही मात्र, प्रश्नचिन्ह आयुष्यभर मनात घेऊन वावरतात.