शब्द मनातले


आपण एखाद्या व्यक्तीवर आपला हक्क समजून 
त्याच्याशी बोलतो पण हळू हळू आपल्या लक्षात येते  
की त्या व्यक्ती ने आपल्याला तो हक्क मुळीच दिलेला नाही.

आपल्या लक्षात येते तो पर्यंत उशीर झालेला असतो 
आपण त्या व्यक्ती ला हक्क दिलेला असतो 
हक्क आपल्याला दुखावण्याचा.
जरी आपण न मिळालेला हक्क गाजवणं बंद करतो 
तरी आपण दिलेला हक्क मात्र इतक्या सहजच परत घेत येत नाही.
ते दुखणं कायमच मनात घर करून राहते, मनाला पोखरत राहते.

 सगळे सुरळीत चालू असताना अचानकच चालता चालता ठेच लागावी 
अशा त्या आठवणी आठवतात.

दुखावला गेलेला पाय जसा आपण हाताने चोळतो 
तसे मग आपण मनाची समजूत काढतो - 
जे होते ते चांगल्यासाठी होते, जे झाले ते चांगल्यासाठी झाले.

पण - 
मग का हसता हसता अचानकच डोळे भरून येतात?
ऐकलेले/वाचलेले कटू शब्द आठवून का छाती जड होते?
सरळ रस्त्याने चालता चालता का अचानकच ठेच लागते?



Return to Main Page




~ Survivor ~ Ongoing series on You Me & Stories