खूप वाटतं मला ...
कधीतरी असंच मनाप्रमाणे वागावं
मनात येईन ते करावं
आयुष्याच्या नियमांपलीकडे काय आहे हे पहावं
जगावं आणि उघड्या डोळ्यांनी विश्व पहावं

पक्षांना उडताना पहावं
समुद्रकिनारी बसून सुर्याला समुद्राच्या कुशीत शिरताना पहावं
झाडावरच्या कळ्यांना फुलपाखराच्या स्पर्शानं फूल बनताना पहावं
वाटतं मला ही फूल बनून जगावं
पावसाच्या थेंबांप्रमाणे झाडा – पानांवर नाचावं
सागराच्या कुशीत वसलेल्या शिंपल्याच्या मिठीत जाऊन मोती बनावं

मान्य आहे मला आज आयुष्य संघर्षाचं आहे
उद्या उजाडेलच की
त्या उद्याच्या प्रकाशात जगावं
वाटतं मला ही खऱ्या अर्थानं जगावं
जे झालं ते मागे सोडावं
नियमांना – बंधनांना तोडावं
खुल्या हवेत श्वास घेत मिळालेलं आयुष्य जगावं

पण –
म्हणतात –
माणसानं नुसती स्वप्नं पाहू नयेत
ती खरी करण्यासाठी झगडावं
खरी होणार नसतील स्वप्नं ती
तर त्या स्वप्नांना पुस्तकात बंद करून ठेवावं.