आज काहीतरी लिहायचय (२)आज काहीतरी लिहायचय
जरासं मन हलकं करायचय
कुणाला ही सांगू शकत नाही ते
कवितेमध्ये विरघळवायचय
आज काहीतरी लिहायचय...

अदृश्य त्या भावना 
त्यांना एक रूप द्यायचय
राग, गृणा, हेवा, इत्यादींना 
शब्दात रंगवून बाहेर काढायचय
आज काहीतरी लिहायचय...

नको असलेल्या त्या विचारांना 
कचऱ्यात फेकण्यासाठी कागदावर लिहायचय
समजूनसुद्धा न समजलेल्या सत्याला कायमचं मिटवायचय
आज काहीतरी लिहायचय...