...


कधी ही न संपणारे स्वप्नं असावे
ठेच लागली कि आपुलकी ने, काळजी ने -
धरण्यासाठी पुढे येणारे हात असावे
बोलून दमले ओठ तर -
डोळ्यातले अबोल शब्द वाचणारे डोळे असावे
दूर क्षितिजापर्यंतच्या प्रवासासाठी तयार सोबत पाउल असावे
प्रवासात दमलोच आपण तर -
क्षणभर सगळं विसरून आधार देणारे बाहू असावे