प्रेम


आपल्या माणसाला ठेच लागली
आणि आपले डोळे भरून आले
की ते प्रेम असतं 

त्याच्या आनंदामध्ये आनंद
समाधानामध्ये समाधान
आपल्या मनस्थितीच्या पलीकडे विचार करणं 
म्हणजे प्रेम असतं 

बोलून दाखवलं नाही कधी 
म्हणजे प्रेम नाही -
असं नसतं,
डोळ्यातल्या अश्रूंमध्ये
ओठांच्या हास्यामध्ये
आपुलकीच्या स्पर्शामध्ये 
आणि कधी कधी 
रागामध्ये सुद्धा 
प्रेम असतं.




Return to Main Page




~ Survivor ~ Ongoing series on You Me & Stories