का कुणास ठाऊक


नेहमी प्रमाणे ह्याही वेळी तेच झालं
मी तुझ्या दिशेने आतुर नज़्रेने पाहत राहिले
पण तुझ्याकडून काहीच उत्तर आले नाही.
का कुणास ठाऊक आजपर्यंतच्या अनुभवातून...
मी कधीच काही शिकले नाही
अजून ही तेच होते
दर वेळी मी तुझ्याकडे अपेक्षे ने पाहते
आणि तू दर वेळी अपेक्षाभंग करतोस

दोन गोड शब्द ऐकावेत तुझ्याकडून
अशी वेडी आशा माझ्या कानांना असते
तू बघशील माझ्याकडे
कधीतरी तुला कळेल माझ्या मनाचे गुपित
समझून घेशील, निदान माणुसकी ह्या नात्याने तरी?

आज तुझ्यात आणि माझ्यात दुरावा आहे
मान्य आहे कि तू आता माझा उरला नाहीस
पण इतका ही परका व्हावास तू?
इतका कि मी तुझ्याकडून कसली ही अपेक्षा ठेऊ नये?
ह्यालाच मैत्री म्हणतात?

निदान मित्र म्हणून तरी माझा राशील
अशी वेडी आशा होती माझ्या वेड्या मनाला
पण नेहमीप्रमाणे तू पुन्हा त्या मनाची आशा मोड्लीस
पुन्हा हे मन खिन्न झाले आहे
ज्या नझर आतुरते ने तुझ्या दिशेला पाहत होते
आज पुन्हा त्या नजरेमध्ये दुखाची सावली आहे

का कुणास ठाऊक अजून ही मी काहीच शिकले नाही
काही दिवसांनी पुन्हा मी अपेक्षित नज़्रेने तुझ्या दिशेने पाहीन
पुन्हा वेड्या मनामध्ये उम्मेद निर्माण होईल
कधीतरी सामझशील तू, मला समझून घेशील...


कधीतरी निदान फक्त मित्र म्हणून माझा होशील.