विचार ...बोलता बोलता अचानकच शब्द हरवून जातात
मनाच्या भावना मग मनात घर करून राहतात
सुचत नाही काही, मनाची घुसमट होते
डोळ्यांमध्ये मग अश्रूंची दाटी होते
कुठेतरी एका कोपऱ्यात बसून मन मोकळे करावेसे वाटते
कधी कधी बेभान वाऱ्याप्रमाणे पळत सुठावेसे वाटते