आज काहीतरी लिहायचय ...आज काहीतरी लिहायचय
मनात कुडत असणाऱ्या भावनांना शब्दात पेरायचय
नकळत अश्रूंमध्ये वाहणाऱ्या दुखाःला
कवितेत उतरावून हसवायचय
आज काहीतरी लिहायचय

आरश्यात बघून स्वतःला शोधायचय
शोधता शोधता मग हळूच लाजायचय
आरश्यात दिसणाऱ्या तुझ्या प्रतिमेला हृदयात उतरवायचय
आज काहीतरी लिहायचय

मैत्रीच्या रेशीम धाग्याला कागदावर सजवायचय
एक एक करून सगळ्या मित्र-मैत्रिणींना आठवायचय
आज काहीतरी लिहायचय

आयुष्याच्या कटू सत्याला थोड्या वेळ विसरून
मनातल्या सुंदर विश्वात जगायचय
आज काहीतरी लिहायचय

लिहायचंय म्हणता म्हणता खूप लिहिले
इतके लिहून देखील वाटतंय अजून खूप लिहायचंय
हो खरंच खूप लिहायचंय
आज काहीतरी लिहायचय