आयुष्य हे...


आयुष्य हे कसे जगायचे?
कुणाला विचारायचे, काय विचारायचे?
प्रत्येक व्यक्ती जगण्याच्या प्रयत्नात असतो,
इथे कोण असा आहे ज्याला पुढचा रस्ता दिसतो?

जे दिसतं ते पहायचे, बाकी दैवावर सोडायचे.
आनंदाच्या क्षणांच्या साठ्याने चेहऱ्यावर हास्य आणायचे
त्या हास्याच्या प्रकाशात अंधाराला सामोरी जायचे...
होय ...
आयुष्य हे असे जगायचे.