हळूवार स्पर्श

हळूवार स्पर्श तुझा तो मन उमलाविणारा
हवा हवा - सा वाटतो मज जीवन जगण्याला..

कुणी नसावे, फक्त तू असावा -
मी मनाचे कडी-कुलूप उघडताना.
मनात पाहावे, समजून घ्यावे -
एक मेकांच्या डोळ्यात पाहताना.
मी माझी नसावी, तू तुझा नसावा -
एक मेकांच्या मिठीत असताना.

हळूवार स्पर्श तुझा तो मन उमलाविणारा
हवा हवा - सा वाटतो मज जीवन जगण्याला..

राणी मी राजा तू -
नको अशी आपुली प्रेम कहाणी.
मी तुझी आणि तू माझा -
पुरे इतकीशी प्रेमळ कहाणी.
समजूत असावी, विश्वास असावा -
हातात एकमेकांचा हात असावा..
आकाशा इतके अफाट प्रेम असावे
हसू असावे, असू देत थोडे आसवे.

हळूवार स्पर्श तुझा तो मन उमलाविणारा
हवा हवा - सा वाटतो मज जीवन जगण्याला..