मला आठवून पहाजुन्या आठवणी कधी तुला आठवतात का?
जसं मला नेतात प्रेमाच्या बागेत तसं तुला ही नेतात का?
एकदातरी जपून पूल टाकण्याची तुझी सवय मोडून पहा
आठवणी नेतील जिथे तुला तिथे जाऊन पहा...
जा तिथे दोन क्षण तिथे थांबून पहा
आठवणींचे कान डोळ्यात साठवून पहा
डोळ्यात तरंगणारे आसवांचे थेंब कुणाची आठवण करून देतात का?
बघ जरा प्रयत्न करून ते थेंब माझा आकार घेतात का.

येशील जेव्हा परतून माघे वळून पहा
तुझ्यासोबत तुझीच सावली आहे का हे निरखून पहा
एकदातरी मला आठवून पहा


एकदातरी मला आठवून पहा