शब्द सुचत नाही


मनात आहेत अनेक विचार
त्या विचारांना दिशा मिळत नाही
बोलायचे आहे खूप काही
शब्द सुचत नाही...


आयुष्याचे काही गणित लगेच सुटतात
काही गणितांची पण उत्तरच सापडत नाही
एक आणि एक दोन हे कळतं
पण एक आणि एक अकरा हे गणित कळत नाही!

डोळे बंध करून विसरावं सागळं
कधीतरी असं वाटतं
पण डोळे मिटूनसुद्धा चित्र बदलत नाही
आयुष्याच्या सारीपाटावर खेळून दमलो तरी
खेळ मधेच सोडून उठता येत नाही

चालत राहायचा असाच, जेव्दः दिसेल ते पाहत
आत्म्याच्या प्रकाशाने आयुष्याची वाट उजाळत...
अंधार रात्रीचा प्रवास करायचा
डोळ्या देखतच्या प्रकाशावर विश्वास ठेवत.