रातराणीचा सुगंध


रातराणीचा तो सुगंध
अजुन श्वासमध्ये दर्वळ्तोय
पौर्णिमेचा तो चन्द्र
अजुन स्वप्नामध्ये हसतोय

तुझा तो स्पर्श जाणवतोय अजुनी
जातो आठवणींच्या विश्वात सोबत घेउनी
तो पूर्ण चन्द्र
आणि मला मिठीत घेतलेला तू
मी हरवुनी गेले होते तुझ्यात
आणि हरवुनी गेला होतास माझ्यात तू...

ती रात्र पुन्हां आठवतेय
मला पुन्हां साद घालतेय
नेशील का मला पुन्हां तीथे?
आपल्या प्रेमाच्या आठवणी -
अजून जीवंत आहेत जिथे

नको आठवू आज
तो दुखवनारा वर्त्तमान
आठ्वंनीँमध्ये हरवून जाऊ आज
विसरून जाऊ देह भान
पुन्हां घे मिठीत मला
पुन्हां में लाजत तुझ्या कुशीत येउन -
स्वतःला विसरून जाते ...

रात्रराणीचा तो सुगंध पुन्हां दर्वळुं दे...


पौर्णिमेचा तो चन्द्र पुन्हा हसू दे...