असं जगायचं असतंकधी कधी काहीतरी विसरायचं असतं
कधी कधी लहानांकडून ही शिकायचं असतं
मनातले विचार विसरून गोड़ हसायचं असतं
डोळ्यातल्या आसवांना ओठांच्या हास्याने सजवायचं असतं

आयुष्यात घडतील अनेक त्रासदायक गोष्टी
त्या सगळ्या गोष्टींना मागे सोडायचं असतं
जेव्हां ही आठवतील जुन्या गोष्टी
त्यातून चांगलं शिकायचं असतं

गेले ले दिवस पुन्हां येत नाहित
प्रत्येक दिवसाला अविस्मार्नियः बनवायचं असतं
जपून ठेवायचे असतात आनंदाचे क्षण आठवणीत
सुखाच्या प्रकाशाने आयुष्यं उजळायचं असतं

कधी कधी काहीतरी विसरायच असतं
कधी कधी लहानांकडून ही शिकायचा असतं
मनातले विचार विसरून गोड़ हसायचा असतं
डोळ्यातल्या आसवांना ओठांच्या हास्याने सजवायचं असतं