बालपण ते शहानपण


गेलं हरवुनी ते निरागस बालपण
जगण्याच्या प्रयतनात
भावनांची वेल सुकूनी गेली
शहानपण जपण्याच्या नादात

बालपण निष्पाप आनंद लूटनारे
शहानपण खोते मुखवटे घालून हसणारे
असेल ते पदरात घालून घेणारे ते बालपण
"वास्तु" ची खोटी किंमत जपणारे शहानपण

कधीतरी वाटतं पुन्हा लहान व्हावं
पुन्हा निरागसपणे जग पहावं
बालपणी डोळ्यांवर मनसः पारख़ण्याचा चश्मा नसतो
सगळं काही चांगलं
प्रत्येक माणूस आपला असतो...

शहानपण जगायला शिकवतं
डोळ्यावर चश्मा चढवतं
माघ सवयचं होउन जाते
प्रतेकाला परखण्याची...
मग संधीच मिळत नाही
निरागसपणे जगण्याची