पण...सगळेजण खोटी नाती निभावतात
समोर हसून पाठीमाघे नावं ठेवतात
हसतात, मस्करी करतात
मनात मात्र कुठेतरी द्वेष भावना ठेवतात

मी ही शिकलेय,
उशीरा का होईना
असं करायला
कुणी आवडत नसलं तरी त्याच्याशी गोड बोलायला

बहुतेक आता कुठे मी समजायला लागलेय ह्या जगाच्या निराळ्या पद्धती
कसा चढवायचा मुखवटा - खऱ्या चेहऱ्यावरती.

पण कुणास ठाऊक कितपत जमेल मला...
कदाचित घुसमट होईल असं करताना
कारण किती ही खोटं वागले मी तरी ही
माझे खरेपण जिवंत राहील असं करताना