कधीतरी...


कधीतरी असंच मनाप्रमाणे वागावं, मनात येईन ते करावं
आयुष्याच्या नियामंपलीकडे काय आहे ते पहावं
खूप वाटतं मला, जरा "जागून" पहावं
जगावं पण फक्त श्वास घेण्यासाठी न्हवे
जगावं आणि उघड्या डोळ्यांनी विश्व पहावं

पक्ष्यांना उडताना पहावं
समुद्र किनारी बसून सुर्याला समुद्राच्या कुशीत शिरताना पहावं

झाडावरच्या कळ्यांना फुलपाखराच्या स्पर्शाने फूल बनताना पहावं
वाटतं मला ही - फूल बनून जगावं
पावसाच्या थेंबानप्रमाणे झाडा पानावर नाचावं
सागराच्या कुशीत वसलेल्या शिंपल्यांच्या मिठीत जाऊन मोती बनावं

मान्य आहे मला आज आयुष्य संगर्षाचं आहे
उद्या उजाडेलंच की...
त्या उद्याच्या प्रकाशात जगावं
वाटतं मला ही खऱ्या अर्थानं जगावं

जे झालं ते मागे सोडावं
नियमांना - बंधनांना तोडावं
खुल्या हवेत श्वास घेत
मिळालेलं आयुष्य जगावं