त्याचे माझे प्रेम असे...


त्याचे माझे प्रेम असे
भर उनात मृगजळ जसे
अस्तित्वात नसून देखील
त्याची उर्मी भासे
त्याचे माझे प्रेम असे

डोळे बंध केले की नज़्रेपुडे तो दिसे
तो आहे सर्वत्र, त्याला विसरू कसे?
दूर क्षितिजावरती त्याची प्रतिमा हसे
त्याचे अस्तित्व एक मृगजळ असे
नको नको त्या आठवणी
नको नको ते विचार
दोन क्षणासाठी मिळाले साथ त्याचे ...
आणि आता ... कायमचा मनावर अत्याचार.

त्याची आठवण येताक्षणी
येई मनाच्या बागेत बहार
वात पाहणे त्याची
वात पाहत राहणे
तो दिसताक्षणी त्याच्या दिशेने धाव घेणे...
माघ येते लक्षात
त्याचे अस्तित्व फक्त माझा मनात
नाही तो माझ्या जीवनात

त्याचे माझे प्रेम असे
भर उनात मृगजळ जसे
अस्तित्वात नसून देखील
त्याची उर्मी भासे
त्याचे माझे प्रेम असे