आहेस अजुनि तू…



आसपास माझ्या 
आहेस अजुनि तू
अव्यक्त भावनांत तू 
भिजलेल्या पापण्यात तू 
डोळे मिटले की 
स्वप्नात तू 
अवती भवती घडणाऱ्या 
घटनांत तू 
हसता हसता अचानकच 
डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूत तू 
रडू आलं कि 
हसवणाऱ्या आठवणीत तू

बालपणी ऐकलेल्या 
रविवारच्या पुरवणीतल्या गोष्टीत तू 
मी बनवलेल्या 
तुझ्या आवडत्या झुणक्यात तू 

आहेस अजुनि -
गोड शिऱ्याच्या गोडव्यात तू.

In loving memory of my father
04. 01. 1941 - 19. 04. 2025





Return to Main Page

~